नवरात्रात वासुंदे येथे जोगेश्वरी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

1 min read

पारनेर दि.३:- तालुक्यातील वासुंदे येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने जोगेश्वरी मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ ते शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. या दरम्यान विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जालिंदर वाबळे यांनी दिली.सप्ताह काळात ह. भ. प. प्रभाकर महाराज कराळे (कारेगाव), ह. भ. प. संतोष महाराज बडेकर (शिवनेरी, पुणे), ह. भ. प. हरिदास महाराज पालवे शास्त्री (आळंदी), ह. भ. प. अशोक महाराज इलग शास्त्री (बोधेगाव), वाणीभूषण ह. भ. प. अनिल महाराज पाटील (बार्शी), भागवताचार्य शब्दप्रभू अंकुश महाराज जगताप, धर्मगुरू ह. भ. प. अमृताश्रम स्वामी महाराज (बीड), महामंडलेश्वर श्री महंत ह. भ. प. काशिनाथदास महाराज पाटील, ह. भ. प. वैराग्यमूर्ती डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी), आदींची कीर्तन सेवा होणार आहे. काल्याचे किर्तन शनिवार दि. १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी ह. भ. प. भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी (वासुंदे) यांचे होणार आहे.

सप्ताह काळात इतर दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ वाजता आरती तसेच सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ६ : ५० आरती, रात्री ७ ते ९ हरी किर्तन, ९ ते १० भोजन, रात्री ११ नंतर हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती आयोजकांच्या वतीने जालिंदर वाबळे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे