इंडियन फार्मास्युटिकल एसोसिएशन लोकल ब्रांच च्या वतीने, आळे येथे “जागतिक फार्मासिस्ट डे” उत्साहात साजरा
1 min read
आळेफाटा दि.२७:- विशाल जुन्नर सेवा मंडळ इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज आळे येथे इंडियन फार्मास्युटिकल एसोसिएशन आळेफाटा (ता.जुन्नर) लोकल ब्रांच यांच्या संयुक्त विदयमाने ‘जागतिक फार्मासिस्ट डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट डे २०२४ ची थीम “Pharmacist: Meeting Global health needs” ही होती.
या कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती व डॉ. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमापूजन करून करण्यात आली. त्यानंतर फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेऊन भव्य रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या भव्य रॅली च्या उदघाटन प्रसंगी इंडियन फार्मास्युटिकल एसोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच चे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड, उपाअध्यक्ष डॉ. बी. सी. हाथपक्की, सह सचिव डॉ. आर. ए. हांडे, परिषद सदस्य डॉ. एस. एल. जाधव, डॉ. एस. डी. घुले व सहभागी फार्मसी महाविदयालयाचे प्रा.ए.ए. भागवत, प्रा. एन. बी. महाले, प्रा.पी. के. झावरे, प्रा. के. बी. वाळूज, प्रा. आर. आर. डोके, प्रा. ए. आर. सोनवणे, प्रा. पी. के. परदेशी, प्रा. एस. ए. सोनवणे इ. उपस्थित होते.
यामध्ये पंचक्रोशीतील विविध फार्मसी महाविदयालयांनी सहभाग घेतला. सहभागी महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी भव्य रॅली काढून पथनाट्य सादर करून जनजागृती केली.भव्य रॅली विशाल जुन्नर सेवा मंडळ इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज आळे येथुन आळेफाटा एस. टी. स्टैंड पर्यंत नेण्यात आली.
व आळेफाटा एस. टी. स्टैंड पासुन विशाल जुन्नर सेवा मंडळ इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज आळे येथे येऊन संपली. या रॅली मध्ये जवळपास ४२५ विदयाथी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग दर्शविला. आळेफाटा एस. टी. स्टैंड येथे जागतिक फार्मासिस्ट डे निमीताने जॅक असोसिएशन आळेफाटा बेल्हा झोन चे सदस्य संजय गांधी,
संदिप कोरडे, अनिल गुंजाळ, विकास गायकवाड, जिवन गडगे, संकेत नवले, सयुर काटे, ऋषी शेळके, श्रध्दा कु-हाडे, जितु भंडलकर इ. उपस्थित होते. संदिप कोरडे यांनी फार्मासिस्ट डे निमित्त सर्व विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदशन केले.
इंडियन फार्मास्युटिकल एसोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच च्या सर्व पदाधिका-यांचा जॅक असोसिएशन आळेफाटा बेल्हा झोन च्या सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनुराधा ताजवे यांनी केले व अश्विनी कवडे यांनी आभार प्रदर्शन केले.