मंगरूळगावात जनावरांना लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव; बैलाचा मृत्यू

1 min read

बेल्हे दि.२६:- जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमधील जनावरांमध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंगरूळ परिसरात जनावरांमध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाने यावर तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी यांनी केली आहे. मंगरूळ परिसरात जवळपास तीन हजार पाळीव जनावरे असून, यामध्ये दुभत्या गायींचा समावेश आहे. या आजाराने परिसरात १५ दिवसांपूर्वी १ बैल दगावला आहे.यामुळे लंम्पी आजारावर लसीकरण मोहिमेबरोबरच आरोग्यविषयक उपाययोजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. गाय, बैल वर्गीय जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

प्रतिक्रिया

मंगरूळ व परिसरातील गावांत लंपी लसीकरण सुरू असून ज्या पशुधन मालकाने जनावराचे लसीकरण करून घेतले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्यास लम्पी चा धोका नसतो. लंपि ची लागण झाल्यास मोठा खर्च पशुधन मालकाला येतो त्यामुळे सर्व पशुधन मालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.

सुरेश इसवे
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, मंगरूळ

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे