वळसे पाटील महाविद्यालयाचा “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा शुभारंभ
1 min read
निमगाव सावा दि.२५:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने “स्वच्छता ही सेवा” या अभियानाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. क्षेत्रीय संचालक, क्षेत्रीय संचालनालय, युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ” स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर आधारित असलेल्या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये या पंधरवड्याच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छता शपथ, महाविद्यालय परिसर स्वच्छता, ग्रामस्वच्छता, प्लास्टिक मुक्त परिसर, स्वच्छता महत्व या विषयावर व्याख्यानमाला इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये दि.२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसर स्वच्छता करण्यात आली. महाविद्यालय परिसरातील झुडपे , गवत प्लास्टिक कचरा इत्यादी गोळा करण्यात आला. यामध्ये 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्वच्छता मोहिमेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.गायकवाड जे .एस, प्रा. गोरडे पी .जे यांनी केले.या अभियानासाठी संस्था प्रतिनिधी सौ.कविता पवार, प्रा.सुभाष घोडे, प्रा अनिल पडवळ प्रा.प्राजक्ता गाडगे, प्रा.आकाश धुमाळ, प्रा.अश्विनी जोरे, प्रा.माधुरी भोर, प्रा.विजय काळे, प्रा.पूनम कुंभार, प्रा.पूनम पाटे, प्रा.धनंजय भांगरे यांचे सहकार्य लाभले.