दूध अनुदानात आता दोन रुपयांची वाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय
1 min read
मुंबई दि.२५:- राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना गायीचे दूध पुरवणाऱ्या दूध उत्पादकांना आता पाचऐवजी सात रुपये अनुदान दिले जाणार आहे. सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. शासनाने दुधाचा दर ३५ रुपये कायम ठेवला असून, दूध संस्थांनी २८ रुपयेच दर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाढीव दर एक ऑक्टोबरपासून देणे बंधनकारक आहे. नव्या निर्णयानुसार, दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ या प्रतिकरिता एक ऑक्टोबरपासून २८ रुपये प्रतिलिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. दूध उत्पादक संघांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.