हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई शिवनेरी बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ :- भरत गोगावले

1 min read

मुंबई दि.३:- एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने (MSRTC) घेतला आहे. एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली. पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी’ नेमली जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे