बदलापूर प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर? गोळीबारात अक्षय शिंदे चा मृत्यू
1 min readबदलापूर दि.२३:- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळ्या झाडात आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र ही आत्महत्या की एन्काऊंटर याच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते. त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला.
या वेळी तीन राऊंड फायर झाले. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.