‘या’ दिवशी मिळणार लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता

1 min read

मुंबई दि.२४:- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबरमध्ये रायगडमध्ये होणार आहे. त्यामुळं येत्या २९ सप्टेंबरला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेचा तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. सोमवारी मंत्रिमंडळची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.

व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे