राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ.कृपाल पवार यांना ‘इंजिनिअरिंग अचीवमेंट अवॉर्ड’
1 min read
अल्हील्यानगर दि.२३:- अशोक भाऊ फिरोदिया ऑडिटोरियम माळीवाडा अल्हील्यानगर येथे, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स अल्हील्यानगर लोकल सेंटर यांकडून रविवार दि. २२ रोजी ५७ वा इंजीनियरिंग डे साजरा करण्यात आला.
इंजिनीयर डे निमित्त झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांना अवॉर्ड देण्यात आले. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ.कृपाल पवार यांना ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’ अहमदनगर लोकल सेंटरचे सेक्रेटरी इंजि. अभय राजे यांच्या हस्ते इंजिनिअरिंग अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला.
संस्थेच्या वतीने सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.दीपक आहेर यांनी खास अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.