मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवाची तयारी सुरू

1 min read

पाथर्डी दि.२०:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव होत आहे. या काळात सर्व धार्मिक कार्यक्रम व विधि केले जाणार आहेत.

भाविकांचा प्रवास सुखकर होणार मोहटादेवीच्या दर्शनासाठी राज्याचा विविध भागातून लाखो देवी भक्त नवरात्र काळात दर्शनासाठी येतात. या भाविक भक्तांच्या सोयी सुविधासाठी मोहटा देवस्थान समितीने प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी कामकाजाला सुरुवात केली आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत मोहटा देवीचे स्वयंभू स्थान स्थापित आहे. या उंच डोंगरावर देवस्थान समितीने भव्यदिव मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिर परिसरात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने परिसर हिरवाईने नटला आहे. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना अडचण येणार नाही यासाठी सुलभ दर्शन बारी, पाणी, शौचालय, पार्किंग, निवारा. महाप्रसाद याची कामे देवस्थान समितीकडून युद्ध पातळीवर सुरू असून देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे.रगरंगोटी, दर्शन बारीतील रेलिंग दुरुस्ती, मंडप उभारणीचे कामे जोरात सुरू आहे. ३ ऑक्टोबर रोजी मोहटादेवी गडावर सकाळी देवस्थान समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे. शुक्रवारी (ता.११) सकाळी ८ ते १२:३० या वेळेत होमहवन व पूर्णाहुती जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे. शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी कावडीचे पाणी व काल्याचे कीर्तन, रविवार १३ ऑक्टोबर रोजी श्री मोहटादेवी यात्रा, पालखी सोहळा, छबिना मिरवणुक, सोमवार १४ ऑक्टोबरला हजेऱ्या व हगामा. बुधवारी १६ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेला नवरात्राची सांगता होणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भाविक भक्तांनी देवी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मोहटादेवी देवस्थानकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे