नाणेघाट रानभाजी महोत्सव कार्यक्रम संपन्न; अनेकांनी घेतला नैसर्गिकरित्या पिकवलेल्या रानभाज्या आस्वाद
1 min read
नाणेघाट दि.२२:- शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय घोडेगाव, महाराष्ट्र शासन कृषी विभाग (आत्मा) व समस्त ग्रामस्थ, घाटघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऋषिकेश परिवार ‘रानभाजी महोत्सव नाणेघाट २०२४’ या कार्यक्रम नाणेघाट येथे संपन्न झाला.
आदिवासी बांधव आपल्या जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीचं, जल, जंगल, जमिनीचं रक्षण आणि जतन करण्याचं काम आदिवासी बांधव शेकडो वर्षांपासून करत आहेत. या ‘रानभाजी महोत्सवा’त आदिवासी बांधवांनी व विशेष करून महिला भगिनींनी जंगलात पिकणाऱ्या पौष्टिक रानभाज्या. जंगली वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली औषधे, विविध प्रकारचे बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती अशा विविध गोष्टींची विक्री केली. यासोबतच आदिवासी महिला भगिनींनी आपल्या आदिवासी संस्कृतीचे नृत्यप्रकार अत्यंत सुरेख पद्धतीने सादर केले.
कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या पिकवलेल्या रानभाज्या ‘रानभाजी महोत्सवा’ च्या माध्यमातून गावाकडील व शहरातील मंडळींना उपलब्ध होतात. या वेळी विविध रानभाज्या, औषधांची आदिवासी बांधव व महिला भगिनींकडून माहिती घेत. त्यांच्याशी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी संवाद साधला आणि काही पदार्थांची चवही चाखली. या महोत्सवासाठी उपस्थित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर मंडळींचा सत्कार व सन्मान केला.
प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, संतोषनाना खैरे, दिलीप गांजाळे, प्रदीप देसाई, सुनिल जाधव साहेब, सतीश शिरसाठ, श्रीधर काळे, गणेश भोसले, बाळासाहेब लोहोकरे, सूर्यकांत विरणक.
सुमनताई आढारी, शैला रावते, गणपत जोशी, सुरेश जोशी, राहुल पाटील यांच्यासह इतर मान्यवर, घाटघर ग्रामस्थ व आदिवासी बांधव, महिला – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.