गुळुंचवाडी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मंजूर

1 min read

बेल्हे दि.२० :- गुळंचवाडी (ता. जुन्नर) येथे १९ जुलै २०२४ रोजी कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. अपघातात मृत्यू पडलेल्या या पाचही जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३ लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाले असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर ८ ते १० गंभीर जखमी झाले होते. ही घटना शुक्रवार दि.१९ जुलै सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्याण- नगर महामार्गावर घडली होती.

या अपघातात शितल योगेश दाते (वय ३०) व मुलगा रियांश योगेश दाते (वय ५ वर्ष) राहणार आणे, तालुका जुन्नर), दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (वय ६२, राहणार गुळंचवाडी, ता. जुन्नर) हे तिघे जागीच ठार झाले होते

तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (वय ८० राहणार, गुळंचवाडी, तालुका जुन्नर) व धोंडीभाऊ सदशिव पिंगट (रा.बेल्हे ता. जुन्नर) हे उपचार दरम्यान मयत झाले होते.

गुळुंचवाडी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३ लाख शासकीय मदत मंजूर झाली असून कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपये मिळाले असून त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार”.

अतुल बेनके, आमदार जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे