जुन्नर तालुक्यातील ८ साकव पूल बांधकामांसाठी ३ कोटी ७५ लक्ष रुपये मंजूर:- आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.१८:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून जुन्नर तालुक्यातील ८ साकव पूल बांधकामांसाठी ३ कोटी ७५ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

या मध्ये खालील साकव पुलांचा समावेश आहे. १) कोळवाडी येथील जाईचे बावन येथे साकव बांधणे.
40 लक्ष,२) गुळुंचवाडी येथे तळई मंदिराशेजारी साकव बांधकाम करणे.30 लक्ष ३) नारायणगाव येथील खडकवाडी मीना कालवा दरम्यान साकव बांधकाम करणे 1 कोटी. ४) पिंपरी पेंढार येथील खडकमाळ ओढ्यावर साकव बांधकाम करणे 35 लक्ष, ५) पिंपळवंडी बंगला वस्ती ते कालेकरवाडी ओढ्यावर साकव बांधकाम करणे 40 लक्ष, ६) बेल्हा गावठाण पाटील ओढ्यावर साकव बांधकाम करणे.40 लक्ष ७) राजुरी गायवाट ते डोबी उक्ते मळा येथे ओढ्यावर साकव बांधकाम करणे.40 लक्ष, ८) साकोरी येथील बेल्हे मंचर रोड ते आसमी मळा येथे साकव बांधकाम करणे.50 लक्ष

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे