बालविवाह प्रकरणी विवाहितेच्या आई वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल
1 min read
शिक्रापूर दि.१९:- शिरूर तालुक्यातील वाडेगाव येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला आई वडिलांनी बालविवाह केल्याची घटना समोर आली. युवतीसह युवकाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता माधव गव्हाणे, माधव सुंदरराव गव्हाणे, कौसाबाई सुंदरराव गव्हाणे, सुनिता साहेबराव गव्हाणे. साहेबराव सुंदरराव गव्हाणे, भाऊ राव दादाराव मोरे, सुमन भाऊराव मोरे, दत्ता भाऊराव मोरे असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.वाडेगाव येथील दत्ता गव्हाणे याच्या आई वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने दत्ता याचा विवाह जमवला.
मात्र युवती अल्पवयीन व सोळा वर्षाची आहे, हे माहित असताना देखील युवतीच्या इच्छेविरुद्ध तिचा वाडेगाव मध्ये बालविवाह केला. विवाहानंतर युवतीचे सासू सारे युवतीला शिवीगाळ, दमदाटी करीत त्रास देखील देऊ लागले.
घडलेल्या प्रकाराबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी युवतीचा पती दत्ता माधव गव्हाणे, सासरे माधव सुंदरराव गव्हाणे, सासू कौसाबाई सुंदरराव गव्हाणे, सुनिता साहेबराव गव्हाणे, साहेबराव सुंदरराव गव्हाणे (रा. वाडेगाव, मूळ रा. साळींबा, जि. बीड), युवतीचे वडील भाऊराव दादाराव मोरे.
आई सुमन भाऊराव मोरे, भाऊ दत्ता भाऊराव मोरे (सर्व रा. कमलापूर, जि. परभणी) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.