जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल; शाळेत ‘गुड टच-बॅड टच’ बाबत मार्गदर्शन ठरले फायद्याचे
1 min read
जुन्नर दि.२६:- अल्पवयीन १० वर्षाच्या मुलीबरोबर अश्लिल चाळे करणाऱ्या एका व्यापाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेजेवाडी येथे घडली.
ज्ञानेश्वर देवराम नायकोडी (वय ५५ रा. तेजेवाडी, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सदरची घटना घडली.
शाळेमध्ये ‘गुड टच-बॅड टच’ बाबत मार्गदर्शन मिळाल्यानंतर पीडित मुलीने तिच्याशी घडणाऱ्या प्रकाराबाबत सांगितल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला. दहा वर्षीय शाळकरी मुलीला आरोपी त्याच्या दुकानात तसेच शेतावर घेऊन जाऊन तेथे तिच्याशी घाणेरडे कृत्य करीत होता.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे करीत आहेत.