बेल्हे येथून कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका; २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

1 min read

ओतूर दि.१५:- नगर-कल्याण महामार्गावर ओतूर (ता.जुन्नर) मोनिका चौक येथे नाकाबंदी वेळी ११ जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना पकडली असून, चालकास अटक केली. जुन्नर न्यायालयाने आरोपीस ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.

गणेश उत्सव व आगामी ईद ए-मिलाद सणाच्या अनुशंगाने अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून या दरम्यान सदर घटना उघडकीस आली.

या बाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, बेल्हे येथून ट्रकमधून गोवंश जनावरांची कत्तलीचे उद्देशाने कल्याण घेऊन जाणार असल्याची माहिती ओतूर पोलिसांना मिळाली.

त्याप्रमाणे मोनिका चौक ओतूर येथे नाकाबंदीदरम्यान १२ सप्टेंबर रोजी रात्री आळेफाटा बाजूकडून आलेल्या ट्रकमध्ये (एमएच १४-एएस ९३९७) ११ गोवंश जनावरे आढळली. चालकाकडे विचारपूस केली असता,

११ गोवंश जनावरे ही बेल्हे येथे विशाल व इर्शाद तसेच फैजान शेख (रा. कल्याण, जि. ठाणे) या तिघांनी माझ्या ट्रकमध्ये भरले असून, फैजान शेख याच्याकडे कल्याण येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. फैजान शेख हा पळून गेला.

एकूण २३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. गुजग्गील अब्दुल हमीद इनामदार (वय ३६, रा. शिपाई मोहल्ला, जामा मस्जिदीसमोर, जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे), फैजान शेख (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कल्याण, जि. ठाणे),

इर्शाद नावाचा इराग (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) व विशाल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर

यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, नामदेव बांबळे, आनंदा भवारी,शामसुंदर जायभाये, महेश पटारे, ज्योतीराम पवार, संतोष भोसले केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे