विलास वाव्हळ यांच्या विधानसभा उमेदवारी साठी जुन्नर मधील तेली समाज एकवटला; ओबीसी समाज ही पाठीशी
1 min read
जुन्नर दि.१७:- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष संघटक विलास वाव्हळ हे जुन्नर विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांचे समर्थनार्थ जुन्नर तालुक्यातील तेली समाजबांधव व समर्थकांची बैठक नुकतीच जुन्नर येथे संपन्न झाली. त्यांच्या उमेदवारीची मागणी तेली समाजाने व समर्थकांनी लावून धरलेली आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे विलास वाव्हळ यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांचे भविष्यातील कामाचे थोडक्यात नियोजन सांगितले. निवडून आल्यावर सर्व प्रथम संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे यास प्राधान्य दिले जाईल.
संताजी महाराज जगनाडे यांचे भव्य स्मारक नवी मुंबई येथे उभारण्या साठी प्रयत्न केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात तेल घाणी चा प्रकल्प चालू करून तेली बांधव मुले मुली यांना त्या द्वारे तेल निर्मितीचे प्रशिक्षण वर्ग चालू करणे. अशी कामे तेली समाजासाठी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जुन्नर तेली सामाज्याचे अध्यक्ष संजय करपे, माजी अध्यक्ष सोमनाथ काळे, माजी नगर सेवक शिवसेना अविनाश ‘करपे, यांच्यासह गोरख आवळे, मयूर वाव्हाळ, सोमनाथ काळे, राम करपे, संजय करपे, विनायक करपे, मिलिंद झगडे, बंडु करपे, महेश घोडेकर, राजेंद्र करपे.
गोकुळ भागवत, गणेश वाकचौरे, अविनाश कर्डिले, आदी प्रमुख पदाधिकारी व शेकडो समाज बांधव उपस्थित होते. वाव्हळ यांनी जुन्नर तालुक्यात मतदारांच्या भेटीगाठी, घरगृहभेटी, गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
कोण आहेत विलास वाव्हळ?
विलास वाव्हळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते. महाराष्ट्रातील तेली समाजाचा महत्त्वाचा चेहरा विलास वाव्हळ आळेकर मागील ३५ वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पार पाडली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष संघटक आणि पक्ष कार्यकारी सदस्य, बृहन महाराष्ट्र तेली समाज, संताजी तेली क्रांती मोर्चा चे संस्थापक अशा पदांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहे. शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख या पदावर असताना.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन विजय प्राप्त करून दिला आहे. तसेच महाराष्ट्र सह गुजरात राज्यातही त्यांचे तेली समाजावर प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात २८ विधानसभा मतदारसंघ असून.
सर्व मतदारसंघांमध्ये तेली समाजाचे मोठे वर्चस्व असून जर का विलास वाव्हळ यांना उमेदवारी दिली तर निश्चितच जुन्नर सह विदर्भातही तेली समाजाकडून उद्धव ठाकरे यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.