वडज उपसा सिंचन योजनेची पहिली निविदा काढा, मगच नारळ फोडा;अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार:- प्रमोद खांडगे पाटील
1 min readजुन्नर दि.१७:- वडज उपसा सिंचन योजनेची पहिली निविदा काढा, मगच नारळ फोडानाहीतर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वडज धरणावर जलसमाधी आंदोलन करणार अशी मागणी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना प्रमोद खांडगे पाटील यांनी केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, तोंडी मंजुरी आणि निधी मिळूनही वडज उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळत नाही. आचार संहिता तोंडावर असूनही प्रकल्प कार्यालयातून काहीच हालचाली होताना दिसत नाही.सर्व्हे चुकीच्या पद्धतीने करून किंवा वेळ लावून गेली अनेक वर्ष प्रकल्प असाच रेंगाळत आहे. 2019 पासून मंजुरी च्या गोष्टी ऐकून ऐकून येथील शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. पुन्हा 5 वर्ष असेच चालू राहील आणि वर्षेंनवर्ष हा प्रश्न तसाच चालू राहतो की काय? असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मीना खोऱ्यातील या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी. महत्वाची योजना वडज उपसा सिंचन या योजनेसाठी शासनाने ३५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करत प्रकल्पाला मान्यता दिली. अश्या बातम्याही वर्तमानपत्रांना पाहण्यात आल्या. या योजनेच्या माध्यमातून सावरगाव, खिलारवाडी, निमदरी, धोंडकरवाडी, एकनाथवाडी, काचळवाडी, पाबळवाडी. निळोबाराय नगर यांसह इतर वाड्या वस्त्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र हा फक्त वेळ घालवण्याचा खेळ आहे का, असे शेतकऱ्यांना येथील शेतकऱ्यांना वाटत आहे.यासाठी 1991 पासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मागील वर्षी 30 जुलै 2024 ला मोठ्या संख्येने महिला भगीनी, तरुण वर्ग व शेतकरी सतत अगदी भर पावसात उपोषणासाठी तहसील कचेरी समोर बसले. होते. त्यानंतर 15 ऑगस्ट ला जलसमाधी घेण्यापर्यंत विषय गेला. मात्र वर्षा मागून वर्ष गेली मात्र आमच्या नशिबी फक्त घोषणाच आल्या. प्रत्यक्षात काहीच झाले नाही आणि होईल असे वाटत नाही असे येथील शेतकऱ्यांना वाटत आहे. तरी वडज उपसा सिंचन योजनेची प्रत्यक्ष निविदा काढून आचारसंहिता लागायच्या अगोदर योजना चालू व्हावी. ही येथील शेतकऱ्यांची व सकल मराठा समाज जुन्नर तालुका विधानसभा उमेदवार, शेतकरी युवा नेते योगेश तोडकर, मराठा समाज जुन्नर तालुका, रामदास नायकोडी अध्यक्ष कुलस्वामी पाणी वाटप संस्था, अनिल गावडे अखिल भारतीय शेतकरी संघटना जुन्नर तालुका अध्यक्ष नवनाथ भांबेरे, सचिन थोरवे युवा अध्यक्ष जुन्नर शेतकरी संघटना यांची तीव्र मागणी आहे.
चौकट
मी सतत सरकारी यंत्रणा यांचा पाठपुरावा करत आहे मात्र त्यात अजूनही वर्षभर काहीही होऊ शकता नाही. त्यामुळे सरकार फक्त निवडणुकीसाठी जनतेला खोटे फसवत आहे त्यामुळे अगोदर निविदा काढा मगच नारळ फोडा नाहीतर 12/10/2024रोजी वडज धरणावर जलसमाधी आंदोलन करणार
प्रमोद खांडगे पाटील
जिल्हाध्यक्ष:अखिल भारतीय शेतकरी संघटना