जगातील सर्वात उंच उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाद्याचे आळेफाटा येथे जोरदार स्वागत

1 min read

आळेफाटा दि.१६:- जगातील सर्वात उंच उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाद्याचे आळेफाटा (ता‌.जुन्नर) या ठिकाणी फटाक्यांच्या आतीषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून गोंद्रे गावात उभा रहात असलेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येत असुन पुतळा बनवण्याचे काम जयपुर या ठिकाणी चालु असून सुरवातीला एका पाद्याचे आळेफाटा या ठिकाणी आणल्यानंतर पारंपरिक वाद्य वाजवत फटाक्यांच्या आतीषबाजीत व जे.सी.बी मधुन फुले टाकण्यात आली. व त्यानंतर माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, पंचायत समितीचे माजी सदस्य जिवन शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या प्रसंगी दिलीप मेदगे, वडगाव आनंद गावचे माजी सरपंच प्रदीप देवकर, दिगंबर घोडेकर. सुशांत दरेकर, गणेश गुंजाळ संतोष घोटणे, मयुर पवार, सचिन वाळुंज, कैलास वाळुंज तसेच परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची एका पाद्याच चे वजन ४ हजार किलो असुन जयपुर या ठिकाणाहून आळेफाटा या ठिकाणी पुजा केल्यानंतर पिंपळवंडी. चौदा नंबर, नारायणगाव , धनगरवाडी, तेजेवाडी, ओझर, हिवरे बु., हिवरे खु. ठिकेकरवाडी, धोलवड फाटा, ओतुर, उदापुर, बनकर फाटा, पांगरीमाथा, गोळेगाव, लेण्याद्री फाटा, आलदरे, पिंपळगाव चौक, जुन्नर या ठिकाणी सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे