५० गुंठ्यांत कोथिंबीरीचे साडेआठ लाखांचे उत्पन्न; शेतातच जल्लोष करत गुलाल उधळून आनंद व्यक्त

1 min read

शिक्रापूर दि.१४:- पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ कर्पे यांनी त्यांच्या पन्नास गुंठे शेतात पिकवलेल्या २० किलो धनामधून पंधरा हजार जुड्या कोथिंबीर घेत तब्बल ८ लाख ५१ हजारांचे उत्पन्न मिळवले आहे.

शेतकरी बाळासाहेब कर्पे यांनी त्यांच्या पन्नास गुंठे शेतात जुलै २०२४ च्या अखेरीस कोथिंबीरीची (धना) पेरणी केली. त्यानंतर बाळासाहेब यांची चार मुले देविदास कर्पे,
मोहन कर्पे, किरण कर्पे, विशाल कर्पे यांनी शेतामध्ये विशेष लक्ष केंद्रित करत स्प्रीन्करच्या माध्यमातून वेळेवर पाणी देऊ करत. कोथिंबीरचे चांगले पिक फुलवले, कर्पे यांना यापिकासाठी एकूण ४० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. सध्या कोथिंबीरला चांगला बाजारभाव असताना नुकतेच मंचर येथील श्री सद्गुरू व्हेजिटेबल कंपनीचे संचालक आदेश पोखरकर, गणेश शिंदे, सोमनाथ काटकर, पप्पू शेवाळे यांनी कर्पे यांच्या शेताला भेट देत. त्यांच्या शेतातील सर्व कोथिंबीरचा जागेवर व्यवहार करत सर्व पन्नास गुंठे मध्ये असलेली कोथिंबीर चक्क आठ लाख एक्कावन हजार रुपयांना घेतली.यावेळी कर्पे बंधूंनी शेतातच जल्लोष करत गुलाल उधळून श्री सद्गुरू व्हेजिटेबल कंपनीच्या संचालकांचा सन्मान केला. शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या या अनोख्या उत्पन्नाची चर्चा चक्क पुणे जिल्ह्यात रंगत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे