जुन्नर तालुक्यात चालु वर्षी कापसाचे उत्पादन वाढणार
1 min read
जुन्नर दि.३:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चालू वर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून बागायतदार शेतकरी सुद्धा कापसाची शेती करत असल्याचे चित्र समोर आले आहे.यंदा तालुक्यात ८५ ते ९० हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे.
विदर्भ व मराठवाड्यात घेतले जाणारे पीक ज्याची ओळख ‘पांढर सोन’ अशी आहे म्हणजेच कापूस. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी,जाधववाडी, बोरी बुद्रूक या पिकाची काही शेतकऱ्यांना आवड लागली असुन चालु वर्षी मोठ्या प्रमाणावर या परीसरात लागवड झालेली दिसुन येत आहे.जुन्नर तालुक्याचे वातावरण या पिकासाठी योग्य आहे असुन चालु वर्षी भिजत पाऊस झाला असल्याने कापसाचे पीक जोमात आलेले दिसुन येत आहे. कापसाच्या पिकाला इतर पिकांपेक्षा कमी मशागत करावी लागते. आवश्यकते नुसार तीन चार वेळा फवारणी केली जाते.
तरकारी पिकांना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. तरकारी पिकाला भाव कधी कमी तर कधी जास्त मिळतो. भाव कमी मिळाला की शेतकऱ्याला नुकसानीला सामोर जावं लागतं.परंतु कापसाचे पीक शेतकऱ्यांचे शक्यतो नुकसान करणार पीक नाही. तसेच कापूस विकण्यासाठी साकोरीत येथे बाजारपेठ आहेत.
या परीसरातील काही शेतक-यांनी गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कापसाचे पीक आपल्या शेतात घेत आहेत. कापूस काढल्यानंतर शेतात दुसरे पीक ही घेता येते. गेल्या वर्षी ६० ते ७५ रुपये बाजारभाव मिळाला भाव होता.
प्रतिक्रिया:- “कापुस हे पिक तसे विदर्भात जास्त होते परंतु मागील ४ ते ५ वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात बागायती भागात कापसाचे क्षेत्र वाढले आहे तसेच खात्रीचे व्यापारी इथे जागेवरून माल नेतात आणि सुरक्षित आणि कमी महिन्यात जास्त उत्पादन आणि नफा मिळवून देणार पिक म्हणून शेतकरी याकडे आकर्षित झाला आहे.
खरीप मध्ये याची पेरणी केली की ४ महिन्यात पूर्ण पीक निघून जाते .तसेच या भागात कापूस पिकाला पोषक हवामान आहे आणि कोणत्याही रोगचा किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. त्यामुळे कीटकनाशक याचा खर्च कमी होतो व सफेद सोन म्हणून अलीकडे या कडे आपल्या कडील शेतकरी पाहू लागला आहे.
तसेच उसाला पर्याय म्हणून कमी महिन्यात जास्त नफा अशा सर्व बाबी मुळे कापूस शेती फायद्याची ठरत आहे चालु वर्षी तालुक्यात ८५ ते ९० हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे.”
राजश्री नरवडे, कृषी सहाय्यक