मंचर कृषी उत्पन्न बाजारात कांद्याला मिळाला उच्चांकी भाव

1 min read

मंचर दि.४:- मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला ५३५ रुपये उच्चांकी भाव मंगळवारी (दि.३) रोजी मिळाला. कांद्याचे दर पुढीलप्रमाणे गोळे कांदे ३३२ पिशवी सुपर लॉट १ नंबर गोळ्या कांद्यास रुपये ५०० ते ५३५ रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ४७० ते ५०० रुपये, सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ४२० ते ४७० रुपये गोल्टी कांद्यास ३५० ते ४२० रुपये, बदला कांद्यास १८० ते ३०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

दरम्यान, या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर बाजारात १६१०० हजार पिशवी कांद्याची आवक झाली होती अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी कांद्याची योग्य प्रतवारी करून कांदा बाजार आवारात विक्रीसाठी – आणावा असे आवाहन पानसरे यांनी केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजार आवारात आज १६१०० हजार कांदा पिशव्याची आवक झाली.

मे.इंदोरे आणि कंपनी आडतदार योगेश इंदोरे यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी संदीप भगवान थोरात, चांडोली खुर्द यांच्या कांद्याला दहा किलोस ५३५ रुपये असा आत्तापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला.

तर में. गोपाल कृष्ण ट्रेडर्स किरण निघोट व वसंत थोरात यांच्या गाळ्यावर मुक्ता भाऊ टाव्हरे निरगुडसर दहा किलो कांद्यास ५११, घनश्याम बाळासाहेब बाणखेले ५२१ रुपये बाजार भाव मिळाला.

आवक कमी असल्याने व उत्तर भारतात कांद्याला मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात एवढी उच्चांकी वाढ झाल्याचे बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे