पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन
1 min read
आळेफाटा दि.१२:- बेल्हे, आणे, राजुरी, मंगरूळ, पारगाव, साकोरी व परिसरातील पाच दिवसांच्या बाप्पाला आनंदात निरोप देण्यात आला. पाच दिवसांच्या घरगुती बाप्पाला साध्या पद्धतीने निरोप देण्यात आला.
चालू वर्षी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा थोड्या फार प्रमाणात पाऊस झाल्याने नद्या व ओढ्यांना पाणी असल्याने गणेश विसर्जन करणे सोपे झाले आहे. कुकडी नदी व कॅनॉल मध्ये ही पाणी असल्याने बाप्पाचे विसर्जन करणे सोपे झाले आहे.विसर्जन मिरवणुकीत पुरुषांप्रमाणे, मुले, महिला यांचाही मोठा सहभाग होता.’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा आवाजाने सर्व परिसर गर्जत होता.