नळवणे श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थानात सोमवती अमावस्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

1 min read

नळवणे दि.३:- श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान नळवणे (ता.जुन्नर) येथे सोमवती अमावस्या सोहळा सोमवार दि.२ रोजी श्रध्दापुर्वक मंगलमय वातावरणात संपन्न झाला. श्री पहाटे मंगल स्नान, आरती, सकाळी ८.३० वाजता गडावर पालखी मिरवणूक,

९.३० वा. श्री ची महाआरती व नैवेद्य, खोबऱ्याची उधळण, तळी भंडार, महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले. सोमवती निमित्ताने अन्नदान कटाळवेढे, ता.पारनेर भाईक येथील भाईक परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाणी,

प्रदक्षिणा व दर्शन व्यवस्था, भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे