बेल्ह्यात श्री मुक्ताबाई देवीच्या यात्रेनिमित्त सोंगांचा कार्यक्रम रंगला

1 min read

बेल्हे दि.२:- पारंपारिक सोंगांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवकलाकारांना नवसंजीवनी देणारे, लोककला मोठ्या उत्साहात साजरे करणारे ‘सोंगाचे गाव’ म्हणून संपूर्ण जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बेल्हे गावाची ओळख आजही कायम आहे. श्रावण महिन्यात येणारे सलग सहा मंगळवार श्री मुक्ताई देवीच्या यात्रेची परंपरा गेल्या शंभर ते दीडशे वर्षापासून जपत असणारे बेल्हे गाव सोंगांचीही परंपरा जपत असून श्रावणातल्या चौथ्या मंगळवारी येथील पारंपारिक सोंगांचा कार्यक्रम बघण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने गर्दी करतात.

श्रावण महिन्यात बेल्हे गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री मुक्ताई देवीचे यात्रा गावात बेल्हे गावातील आळीनुसार ठरलेली असून या यात्रेची परंपरा गेल्या शंभर दीडशे वर्षांपूर्वीची आहे असे येथील जुने जाणत्या कडून समजते. पहाटे देवीला आंघोळ घालण्यापासून साडी चोळी, देवीची आरती. मांडव डहाळे, कलगीतुऱ्याचे कार्यक्रम, दुपारी शेरणी, संध्याकाळी महाप्रसाद व रात्री देवीचा छबीना व लोककला असलेला लोकनाट्याचा कार्यक्रम असे प्रत्येक मंगळवारी होत असून त्यातही चौथ्या मंगळवारी म्हणजे रामोशी व माळी जुना मोटार स्टॅन्ड या आळीच्या माध्यमातून पारंपारिक सोंगांचा विशेष कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये राम लक्ष्मण,नवनाथ,महाकाल,कैलास पर्वत व त्या ठिकाणी असणार श्रीशंकराचं कुटुंब,आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक,वाघ्या मुरळी,छत्रपती शिवरायांची स्वराज्याची शपथ,बेटी बचाव,बेटी पढाव,साक्षरता मोहीम, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान अशी एक ना अनेक सोंगे दरवर्षी होत असतात आणि त्याला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लाभत असतो. चौथ्या मंगळवार यात्रोत्सवानिमित्त कलगीतु-यांबरोबरच जागरण गोंधळ व रायरेश्वराची शपथ आदी जनजागृती पर सोंग सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. येथील श्री मुक्ताबाई देवीचा चौथा मंगळवार रामोशीआळी, माळआळी, व जुना मोटार स्टॅडच्या वतीने दरवर्षी परंपरा जपत साजरा केला जातो.या कार्यक्रमात सकाळी लेझीम च्या तालावर वाजत गाजत मांडव डहाळे निघाले होते. त्यानंतर श्री मुक्ताबाई मंदिरासमोर कलगीतु-याचा कार्यक्रम रंगला. यामध्ये कलगीवाले शाहीर नानासाहेब साळुंखे आणि पार्टी (श्रीगोंदा) व तुरेवाले शाहीर रामदास गुंड आणि पार्टी (काटाळवेढा) यांचा कार्यक्रम रंगला. सायंकाळी शेरणी वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर रात्री पालखी ची भव्य मिरवणुक काढण्यात आली.त्याचबरोबर सोंगाचाही कार्यक्रम होता.खेडेगावात आजही पारंपरिक सण,उत्सव साजरे करुन परंपरा जपल्या जातात. या यात्रेनिमित्त, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, नवनाथ,अघोरी विद्या,राजे उमाजी नाईक,जागरण गोंधळ.रायरेश्वराची शपथ व बाहुल्यांचा खेळ आदी सोंगे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर रात्रौ शकुंतला चव्हाण नगरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. या वेळी पारंपरिक सोंगाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात येते.या ठिकाणी सोंगे पहाण्यासाठी तालुक्यातुन तसेच इतर ठिकाणांहुन लोक सोंगे पहाण्यासाठी आले. होते.रात्र थोडी सोंगे फार याची प्रचिती या ठिकाणी येते. यात्रा यशस्वी तेसाठी रामोशी आळी, माळआळी व जुनामोटार स्टँडच्या कार्यकर्ते यांनी विषेश प्रयत्न केले. ॠग्वेद फाकटकर, विपुल शिरतर, प्रतिक कोल्हे आदींनी सोंगे उत्कृष्ट सजविली होती.शेवटच्या सहाव्या मंगळवारी वाघ्या मुरळीच्या स्पर्धा संपन्न होत असतात व त्यानंतर कुस्त्यांचा आखाडाही होत असतो. श्रावणातले सर्व मंगळवार यात्रा होत असताना प्रत्येक आळीचा कार्यकर्ता वेगळा असतो. पहिला मंगळवार पेठ आळीचे विश्वनाथ डावखर, गोरक्षनाथ वाघ, बबन बांगर, पोपट संभेराव, संकल्प विश्वासराव, अजय गुंजाळ दुसरा मंगळवार बाजार आळी त्यामध्ये नंदू ढूमणे, शिवाजी डुंबरे, जानकू डावखर, बन्सी डावखर, अनिल गाडेकर, तिसरा मंगळवार पिंगट आळीमध्ये नाना घोडे.न प्रदीप पिंगट, रमेश पिंगट, सावकार पिंगट, मनोहर पिंगट, निवृत्ती गटकळ, स्वप्नील मुंजाळ, चौथा मंगळवार रामोशी व माळी जुना मोटर स्टॅन्ड पाराजी बोरचटे, मारुती गुंजाळ निवृत्ती भुजबळ, नाना भुजबळ, राजेंद्र गफले, बाळकृष्ण शिरतर, स्वप्निल भंडारी, दत्तात्रय बोऱ्हाडे. नंदू गुळवे पाचवा मंगळवार गुंजाळवाडी साठी सोडला असून सहावा मंगळवार संपूर्ण गाव व सहा वाड्या मिळून साजरा होत असतो त्याचे नियोजन अशोक घोडके, जयवंत घोडके, बन्सी डावखर, दत्ता संभेराव इत्यादी कार्यकर्ते करत असतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे