गुळूंचवाडी येथे तळ्याई गणेश मित्र मंडळाची आदर्श बाप्पाची मिरवणूक

1 min read

गुळूंचवाडी दि.१७:- तळ्याई गणेश मित्र मंडळ गुळूंचवाडी देवकरमळा यांच्या वतीने डिजेचा कर्णकर्कश आवाज न करता आणि गुलालाची उधळण न करता टाळ मृदंगाच्या गजरात अगदी साध्या पद्धतीने मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले.

गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत महिला आपल्या डोक्यावर कलशपात्र घेऊन फुगड्या खेळताना दिसून येत होत्या. लहान मुले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला,

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पा चालल्याचे दुःख आनंदात सामील करून घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. हल्ली गावागावात आणि गल्लोगल्ली कानठळ्या बसवणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि त्याला लावलेल्या लेझर लाईट तसेच गुलाल उधळीत गणपती बाप्पाची धूमधडाक्यात मिरवणूक काढत विसर्जन करण्यात येत असते.

पण गुळूंचवाडी येथील तळ्याई गणेश मित्र मंडळ देवकर मळा यांनी या पद्धतीला फाटा देत साध्या पद्धतीने गणपती बाप्पाची मिरवणूक काढून विसर्जन केले.

काही नागरिकांना गुलाल नाक तोंड डोळ्यात गेल्यास बाधा उत्पन्न होऊन त्रास होतो तसेच डिजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे कित्येक जणांना हृदयविकार आणि कानाचे आजार झाल्याचे आढळून आले आहे त्यामुळे आमचे मंडळ गेली पाच वर्षे गुलाल न

उधळता आणि डिजे न लावता साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन करत आहोत असे मंडळाचे अध्यक्ष गंगाराम गुंजाळ यांनी सांगितले. बाप्पाच्या मिवणुकीदरम्यान लहान मुले स्त्रिया आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून मंडळाचे कार्यकर्ते संतोष आग्रे, नामदेव आग्रे, गंगाराम गुंजाळ, ज्ञानेश्वर देवकर, निवृत्ती देवकर, रामदास देवकर, सोपान देवकर, श्रीकृष्ण देवकर, दादाभाऊ देवकर, विशाल देवकर, जालिंदर देवकर,

सागर देवकर, बाळासाहेब देवकर, मच्छिंद्र देवकर, अशोक देवकर, गणेश देवकर, सुभाष देवकर यांनी सलग अकरा दिवस विशेष प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे