विशाल जुन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रम
1 min read
आळे दि.२७:- विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वूमन, आळे (ता.जुन्नर) राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि.१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नियमित उपक्रमांदरम्यान महाविद्यालयाचा परिसर, अंबिकामाता मंदिर परिसर, जि. प. शाळा कोळवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सहकारी दूध उत्पादक संस्था, आळेगाव या विविध परिसरात स्वच्छता, कालबाह्य औषधे संकलन, झाडांना रंग देणे, वृक्षारोपण व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे. असे विविध उपक्रम स्वयंसेवकांनी योग्यरितीने पार पाडले. उपक्रमांदरम्यान ऐतिहासिक स्थळ म्हणून किल्ले नारायणगड, खोडद येथेही विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून श्रमदान केले, त्यावेळी खोडद ग्रामपंचायतचे उपसरपंच रविंद्र मुळे व इतर अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
आयोजित उपक्रमांची सांगता स्वच्छता व आरोग्यविषयक रॅलीने करण्यात आली. यामध्ये तीनही महाविदयालयाचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले होते.रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी आळेगाव मध्ये पथनाट्य सादर करून स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती केली.
या उपक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनावणे, सर्व अधिकारी, पदाधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. डी.डी गायकवाड, वायपरचे प्राचार्य डॉ. एस. एल जाधव, आयओपीच्या प्राचार्या डॉ. हांडे मॅडम.
आयओपीडब्ल्यूच्या प्राचार्या ए. एस जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षिक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. उपक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश कुंभार सर व कार्यक्रम समन्वयक प्रा. मयुरी होळकर यांनी केले.