गाैरी-गणपती उत्सवानिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

1 min read

मुंबई दि.२७:- राज्यातील गोरगरीब जनतेला गाैरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी सरकारकडून सर्वसामान्य जनतेला शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्यातील लाखो नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

*मोठ्या प्रमाणात प्रतिसाद*
मागील दोन वर्षांपासून गौरी गणपती, दिवाळी, गुढी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जाते. राज्यातील नागरिकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना यंदाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लीटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे