बेल्ह्यात विद्यार्थ्यांनी चार थर लावून फोडली दहीहंडी 

1 min read

बेल्हे दि.२६:- मॉडर्न इंग्लिश स्कुल बेल्हे (ता.जुन्नर) मधील विद्यार्थ्यांनी चार थर लावून शाळेची दहीहंडी फोडली. शाळेचा प्राचार्य विद्या गाडगे व उपप्राचार्य के.पी सिंग यांनी दहीहंडीचे पूजन केले. मुली व मुले असे दोन गोविंदा पथक तयार करण्यात आले होते. दोन्ही पथकामध्ये टॉस केला मुलींनी टॉस जिंकला.

त्यात इ ७ वी ते १२ वी च्या मुलींच्या पथकानी तीन थर लावून दहीहंडीला सलामी दिली. त्यानंतर त्यांचा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मग मुलांनी दुसऱ्या प्रयत्नात चार थर लावून दहीहंडी फोडली.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी या निमित्ताने श्रीकृष्णाचे नृत्य सादर केले. शाळेच्या शिक्षका अर्चना भुजबळ यांनी दहीहंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के .पी. सिंग, शाळेतील सर्व शिक्षक,

शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ,अध्यक्ष गोपीनाथ शिंदे,सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे