समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या ९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1 min read
जुन्नर दि.२२:- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे अंतर्गत जुन्नर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर येथे पार पडल्या.त्यामध्ये समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दैदीप्यमान कामगिरी केल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर व प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये मुलांबरोबरच मुलींचे प्रमाण लक्षनीय असून या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मुलींनी विविध वयोगटामध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-१४ वर्षे मुली:-४१ किलो वजनी गट, द्वितीय क्र.-सई कोकाटे,५४ किलो वजनी गट, द्वितीय क्रमांक स्वरा शेंडकर,१७ वर्षे मुली,५३ किलो वजनी गट,द्वितीय क्रमांक-श्रद्धा दिघे,६५ किलो वजनी गट,प्रथम क्रमांक -दीक्षा गाडगे,१७ वर्ष मुले:-५५ किलो वजनी गट,द्वितीय क्रमांक -वेदांत चिकणे,५७ किलो वजनी गट,द्वितीय क्रमांक-आर्यन दाते.
१९ वर्ष वयोगट मुले:-६१ किलो वजनी गटामध्ये,प्रथम क्र.-वरद डुकरे,द्वितीय क्र.-हितेश घाडगे,६७ किलो वजनी गटामध्ये ग्रीको या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्र.स्वप्नील चासकर,७२ किलो वजनी गटामध्ये ग्रीको या क्रीडा प्रकारामध्ये,प्रथम क्र.-करण पानसरे, ८६ किलो वजनी गट ग्रीको या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्र.-रोशन लामखडे, खुला गटामध्ये ग्रीको या क्रीडा प्रकारामध्ये.
प्रथम क्र.-वेदांत नवले,१९ वर्षे वयोगट मुली:-५० किलो वजनी गटामध्ये,द्वितीय क्र.-मयुरी झावरे,५७ किलो वजनी गटामध्ये,प्रथम क्र.-वैष्णवी गायके,६२ किलो वजनी गटामध्ये,प्रथम क्र.अलिशा शेख,७६ किलो वजनी गटामध्ये,प्रथम क्र.-पायल चव्हाण.
वरील प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंची राजतोरण कुस्ती संकुल विंझर ता.वेल्हा येथे २३ ते २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,किर्ती थोरात,सुरेश काकडे,डॉ.ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एच पी नरसुडे. प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.