जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मॉडर्नच्या १२ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

बेल्हे दि.२१:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने जुन्नर तालुका सतरीय कुस्ती स्पर्धा चैतन्य विद्यालय ओतूर या ठिकाणी मंगळवार दि. २० रोजी पार पडल्या. यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १४ /१७/ १९ वर्ष वयोगटातील वेगवेगळ्या वजनी गटात ४० विद्यार्थ्यांनी कुस्ती या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

यामध्ये मुलांमध्ये अभय सुनील भसरा, ओम महेंद्र गवळी, चैतन्य भरत आंधळे, आकाश मंगेश सुरुम, विराज नरेश पवार, प्रथमेश देवल्या पागी, दिनेश कशीनाथ राम यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्याच बरोबर मुलींमध्ये सानिका सुभाष पाचालकर, हेमाली प्रकाश दळवी, संस्कृती विष्णू वाढाण, दीप्ती विलास पाटील, निशा संपत उंबरसाडा या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला.

या सर्व १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्तीसाठी निवड झाली आहे. तसेच दिती जुबिन शिंगडा, आयुशी जुबिन शिंगडा, अनुष्का विश्वासराव बोऱ्हाडे, तेजल प्रकाश डोलारे, संचीता दिनकर जाधव, मनवित भागू उराडे, कीर्तन चंद्रकांत धोडी, तुषार निलेश दयात, कुणाल हरिश्चंद्र दुमाडा, सुयोग विष्णू वाढाण, प्रितेश सुलतान सावरे, आशिष सुभाष वाढाण,

अनुष्का सुभाष पाचालकर या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक योगेश शिंदे व विशाल गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीइओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंह व सर्व शिक्षक,पालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विशाल गुजर व योगेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे