जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी विद्यानिकेतन च्या ३ विद्यार्थ्यांची निवड
1 min read
साकोरी दि.२१:- जुन्नर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा चैतन्य विद्यालय ओतूर या ठिकाणी मंगळवार दिनांक 20 रोजी पार पडल्या. यामध्ये विद्यानिकेतन संकुलन साकोरी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. वयोगट १४ /१७/ १९ वर्ष मुले /मुली यांनी या कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये साई डोके, हितेश गवारी, वेदिका चोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या तीनही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्तीसाठी निवड झाली आहे. तसेच कार्तिक गुंजाळ, ओवी सैद, स्वरा भोर, राम दांगट, वेदांत आगळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे अध्यक्ष पी.एम. साळवे.
विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रूपाली पवार – भालेराव पवार, विद्यानिकेतन पी एम हायस्कूल व कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे सर्व शिक्षकवृंद व विद्यानिकेतन संकुलनाच्या वतीने सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .