सिंहगड कॉलेज येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटिग्रेशन इन व्हीएलएसआय डिझाईन विषयावर आधारित अल्पमुदत कार्यशाळा
1 min read
पुणे दि.२२:- सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाने अलीकडेच ५ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत “AI इंटिग्रेशन ऑफ एनर्जी एफिशियंट आर्किटेक्चर्स इन VLSI डिझाइन” या विषयावर एक आठवडाभराचा अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे प्रा. तुषार काफरे व प्रा. मंजुषा नामेवार यांनी सांगीतले. सदर् कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीइओ डॉ. अरविंद शाळीग्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.आर.पी.पाटील व प्रा.जे.ए.देसाई यांनी कामकाज पाहिले.वरील विषयास अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक वक्त्यांमध्ये डॉ. शीतल भंडारी, डॉ. अविनाश पाटील, डॉ. रश्मी महाजन आणि डॉ. शीतल बारेकर यांचा समावेश होता, ज्यांनी विविध विषयावर कौशल्यपुर्व भाष्य केले.
सिस्लॅब ऑटोमेशन प्रा. लि.चे उद्योगतज्ञ अशोक सराफ आणि मार्व्हेल इंडिया चे घनशाम कुंभार यांनीही सदर कार्यशाळेत सध्या वापरले जाणारे तंत्रज्ञान याची माहिती सांगितली. याशिवाय, रोहित सिंगेवार यांनी उद्योगाच्या दृष्टिकोनावर भाषण केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश सहभागींना विषयास अनुसरून मार्गदर्शन करणे व तंत्रज्ञान वापर करण्याच्या ज्ञानाने सुसज्ज करणे हा होता. सदर कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयामधून ६८ जणांनी आपला सहभाग नोंदवला.सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उपप्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागप्रमुख डॉ. एम. बी. माळी, विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.