राजुरीत चोरट्यांनी दोन दुकाने फोडली
1 min read
बेल्हे दि.१८:- राजुरी (ता.जुन्नर) येथील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून पंधरा हजार रुपयांचा लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.१६) रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की राजुरी येथे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारात, मुख्य बाजारपेठेतील अशपाक जाफर चौगुले यांचे आफताप इलेक्ट्रॉनिक दुकानातील पाच हजार रुपये रोख तर दहा हजार किमतीचा दुकानातील माल चोरट्यांनी चोरून नेला.
अशपाक चौगुले हे दुकान उघडण्यासाठी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आले असता त्यांना दुकानाचा दरवाजा उघडलेला दिसला त्यावेळेला चोरी झाल्याचे प्रकार त्यांच्या निदर्शनात आला. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल.
घटनास्थळी आळेफाटा पोलीस दाखल झाले.व घडलेल्या घटनेची माहिती घेतली. राजुरी गावातील मुख्य बाजारपेठेत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्राम सुरक्षा दलाने गस्ती घालून आपली सुरक्षा करणे गरजेचे आहे.