आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ८ मोठे निर्णय, जाणून घ्या नेमके कोणते ?

1 min read

मुंबई दि.१३:- आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील आठ महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले. १)विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार; १४९ कोटी रुपयास मान्यता. २) मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय; लाखो नागरिकांना लाभ. ३)डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना. ४)यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील.५)शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन.६)सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता.७) नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष. ८)सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे