मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल नुकसान टाळण्यासाठी ‘हे ‘ वाचा
1 min read
मुंबई दि.९:- आपण जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर खालील गोष्टी अवश्य पडताळून पाहा. १) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्यांचा फॉर्म Approve झाला आहे, त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. २) ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांना Approve वाट पाहावी लागेल ३) ज्यांचा फॉर्म In Review मध्ये आहे. त्यांचा फॉर्म लवकरच Approve होईल, पण थोडा वेळ लागेल ४) फॉर्म Disapprove झाला तर त्याला Edit करा परत Submit करा जर Edit होत नसेल किंवा Edit Option येत नसेल तर पुढच्या अपडेट ची वाट पहा ५) फॉर्म Reject झाला असेल तर नवीन फॉर्म भरावा लागेल.
पण नवीन फॉर्म सध्या भरले जात नाहीये, त्यामुळे पुढचे अपडेट ची वाट पहावी लागेल ६) फॉर्म Approve झाला आहे, पण SMS Verification pending आहे. त्यांनी काहीच करू नका. त्यांना योजनेचा लाभ मिळेल काही करण्याची गरज नाही ७) नवीन फॉर्म App वरून भरले जाणार नाहीत.
त्यावरून तुम्ही फक्त स्टेटस चेक करू शकता, तेही रात्री चालतंय फक्त. ८) वेबसाईटवरून फॉर्म भरताना खूप अडचण येत आहेत चार-पाच दिवस थांबा त्यानंतर फॉर्म भरा, आता फॉर्म भरला जात नाहीये.