विधानसभेची तयारी सुरू; ३० ऑगस्टला जाहीर हाेणार अंतिम मतदार यादी

1 min read

अहिल्यानगर दि.७:- राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार आता अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे. ही मतदार यादी जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा होणार आहे. साधारणपणे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी आवश्यक असणार्‍या प्रक्रियेचा एक-एक टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यात नव्याने ३२ मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेर १०, नेवासा ६, शेवगाव ३, पारनेर १, नगर शहर ११ आणि श्रीगोंदे १ अशी ३२ मतदान केंद्र नवीन अस्तित्वात येणार आहेत. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रारूप यादीवर २० ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार आहेत. तसेच २० ते २९ ऑगस्ट दरम्यान दाखल हरकतींवर निर्णय घेण्यात येऊन ३० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे