खरीप हंगामासाठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; शेतकऱ्यांना ॲप अद्ययावत करण्याचे आवाहन

1 min read

अहिल्यानगर दि.३:- सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी नोंद मोबाईलद्वारे सुरू करावी. राहाता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन ॲप अद्ययावत करून नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.

मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी केल्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास पीकविमा मिळवण्यासाठी मदत होते. ऑनलाइन ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे महसूल पंधरवडा १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत गावचे तलाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे. व वापरावे याचे प्रात्यक्षिक दाखवून मदत करणार आहेत. शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास गावातील तलाठ्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे