दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

1 min read

निमगाव सावा दि.१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री.पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे गुरुवार दि-०१ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लेखन साहित्यातील योगदान आणि लोकमान्य टिळकांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न यांचा आढावा प्रा.निलम गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये घेतला.

अगदी दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांनी दैदिप्यमान साहित्य कसे निर्माण केले? तसेच त्यांच्या लिखाणातून दलित, कामकरी, कष्टकरी, बहुजन वर्गाचे त्यांनी मांडलेले प्रश्न आणि लोकमान्य टिळकांची चतुःसुत्री स्वराज्य मिळविण्यासाठी किती महत्त्वाची होती. हे प्रा.राहुल सरोदे यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले.

समाजासाठी प्रेरणादायी असणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार तसेच अतिशय खडतर परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेंची जडणघडण आणि लोकमान्य टिळकांनी समाजात सामजिक क्रांती कशी निर्माण केली याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा.प्रल्हाद शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल पडवळ आणि आभारप्रदर्शन प्रा. प्रविण गोरडे यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे, संस्थेच्या महिला प्रतिनिधी मा.कविता पवार, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे