आषाढी एकादशी निमित्त विद्या निकेतन स्कूल बोटा येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

1 min read

बोटा दि.१९:- आषाढी एकादशी निमित्त विद्या निकेतन स्कूल बोटा (ता.संगमनेर) च्या वतिने विद्यानगरी ते घारगाव पायी पालखी दिंडी सोहळा उपक्रम राबविण्यात आला. मुलांनी विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, मुक्ताबाई, निवृत्ती महाराज, भालदार, चोपदार अशी पात्रे मिरवणुकीत सहभागी होऊन पार पाडली.

विद्यार्थ्यांनी खांद्यावर पालखी घेऊन सेवा दिली आहे. विद्यार्थ्यांनी हातामध्ये झाडे लावा झाडे जगवा तसेच सेव सॅाईल सेव लाइफ अशा प्रकारचे फलक हातामध्ये घेऊन समाजाची जनजागृती करण्याचे काम केले आहे. घारगाव ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना स्थानिक भजनी मंडळाने भजन करून भजनानंद दिला.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भजन कीर्तन श्रवण करत फुगड्या खेळत परमार्थिक लाभ घेतला आहे. मुख्याध्यापक सुनिता कडप्पा यांनी मुलांसोबत भजन गायले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती व विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या सी.ई.ओ. डाॅ. विद्युल्लता पाटील यांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढविला.

दिंडीसाठी सर्व शिक्षक, पालक व मुले सहभागी झाले होते. विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट च्या वतीने शाळेतील मुलांना बिस्कीट पुडे खाऊ म्हणून दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे