रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या अध्यक्षपदी दिपक सोनवणे तर सचिवपदी डॉ.संतोष मोरे
1 min read
भोसरी दि.३१:- रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी चा पदग्रहण सोहळा उत्साहात रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरीयन शितल शहा यांच्या उपस्थितीत पार पडला. रोटरी क्लब डायनॅमिक भोसरी अध्यक्ष २०२३-२४ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे दीपक सोनवणे यांच्याकडे तर सचिवपदाची सूत्रे दीपक सोनवणे यांनी डॉ.संतोष मोरे यांच्याकडे हस्तांतरित केली.
स्वागत व प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोककुमार पगारिया यांनी केले. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व जागतिक पातळीवर केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी वर्षभरात झालेल्या प्रकल्पांसह कार्यअहवाल मांडला तर रोटरी ३१३१ प्रांतपाल शितल शहा यांच्यासह फर्स्ट लेडी रागिनी शहा यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत रो.अशोककुमार पगारिया, रो.रामदास जैद, रो.ज्ञानेश्वर विधाटे या माजी अध्यक्ष तसेच वाचनवेल प्रतिष्ठान.
आपला परिवार सोशल फाउंडेशन, अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड, जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे, लेखक संजय नलावडे यांचा सन्मान रोटरीच्या वतीने करण्यात आला. रोटरी क्लबच्या आगामी वर्षात नियोजित उपक्रम व नवीन टिमचे स्वागत नूतन अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केले. तर आभार नवनिर्वाचित सचिव डॉ. संतोष मोरे यांनी मानले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- रो.दीपक सोनवणे-प्रेसिडेंट, रो.संतोष मोरे -सेक्रेटरी, रो.ज्ञानेश्वर विधाते- आय.पी.पी.डायरेक्टर (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग), रो.डाॅ.अशोककुमार पगारिया-चार्टर प्रेसिडेंट /क्लब, अॅडमिन रो.रामदास जैद-फाऊंडेशन डायरेक्टर, रो.केशव काळदाते-खजिनदार, रो.आण्णासाहेब मटाले
-प्रोजेक्ट डायरेक्टर.रो.विजय गोरडे-क्लब ट्रेनर, रो.पांडुरंग वाळुंज-मेंबरशीप डायरेक्टर, रो.डाॅ.योगेश गाडेकर- पब्लिक इमेज/मेडिकल डायरेक्टर, रो.प्रा.सचिन पवार-बेसिक एज्युकेशन व लिटरसी,रो.रोहित भांबूर्डेकर- हॅपी स्कूल,
रो.दत्तात्रय कोल्हे – सी.एस.आर डायरेक्टर,रो.गणेश काशिद-गव्हर्मेंट लायजनिंग,रो.विठ्ठल नवाने-रोटरी युथ एक्सचेंज.रो.प्रशांत रासकर-युथ डायरेक्टर,रो.संतोष हिंगे-बुलेटिन पब्लिकेशन,रो.संतोष मुऱ्हे-वाॅटर सॅनिटायजेशन,
रो.शामसुंदर वराडे-हॅपी व्हिलेज, नवीन मेंबरशीप-रो.विजय बागडे -आय टी डायरेक्टर,रो.बाळासाहेब कोते- फेलोशिप डायरेक्टर,रो.ज्योतिराम भोसले- सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर,डॉ.अमित त्रिपाठी- मेडिकल (ट्रायबल) डायरेक्टर,रो.स्वप्निल भालेराव-स्पोर्टस डायरेक्टर,रो.धनाजी गोमे-एनव्हायरमेंट डायरेक्टर.