घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने जागा न दिल्याने निमगाव सावा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1 min read
निमगाव सावा दि.४ :- निमगाव सावा (ता.जुन्नर) गावचा विकास होत असताना गावामध्ये कचऱ्याचा प्रश्न देखील मोठया प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यासंदर्भात ग्रामपंचायतीने शासन स्तरावर कचाऱ्यासाठी जागेची मागणी केलेली आहे. त्याबाबतची सर्व पूर्तता ग्रामपंचायतीने महसूल विभागाकडे केलेली आहे.
ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची देखील तरतूद केलेली आहे. परंतु ग्रामपंचायतला अद्याप जागा वर्ग झाली नसल्या कारणाने कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यास ग्रामपंचायतीस अडचण येत आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, गावातील एस.टी स्टॅन्डच्या जवळ सार्वजनिक पाण्याच्या ओढा असून सदर ओढयावरून भीमाशंकर ते बेल्हा हा ११२ राज्यमार्ग सार्वजनिक वापराचा पूल आहे. सदर पुलाला लागुनच प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामपंचायत कार्यन्वित असून प्रमुख ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या भेडसावत आहे.
सदरच्या रस्ताच्या कडेला मच्छि विक्रेते बसत असून सदर मच्छिचा कचरा, घाण, कचरा पुलावरून टाकून देत आहेत. तसेच इतर आजूबाजूचे चायनिस व हॉटेल धारक तसेच आजूबाजूचे रहिवासी या ठिकाणीच कचरा, धाण टाकत असल्याने हा भाग प्रदूषित झाला आहे. तसेच रस्ताच्या दोन्ही बाजूंनी आलेल्या गटारा मध्ये सांडपाणी सुद्धा त्याच ठिकाणी येत आहे.
त्यामुळे ओड्यालगत असलेले पाणी पिण्याचे स्त्रोत कुपनलिका (बोरवेल) यामध्ये सुद्धा दुर्गधयुक्त पाण्याचा वास येत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे समाज्य झाले असून त्यामुळे दुर्गंधी, डास यांचा उपद्रव असून आरोग्याची समस्या तयार झाली आहे. हाकेच्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत असून त्यांनाही दुर्गंधी, डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. यामुळे नागरीक आजारी पडत असून आजारी माणसावर विपरीत परिणाम होत आहे.
तसेच वारंवार डेंगू व मलेरिया चे रुग्ण कायमच ह्या परिसरात आढळतात. परिणामतः सदर आरोग्यकेंद्र व आजूबाजूच्या रहिवाशांची कचऱ्यामुळे आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
“ग्रामपंचायतीने ने शासन स्तरावर जागेची मागणी केलेली आहे. त्याबाबतची सर्व कागदपत्र पूर्तता आम्ही महसूल विभागाकडे केलेली आहे. ग्रामपंचायतने घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची देखील तरतूद केलेली आहे. परंतु ग्रामपंचायतीला जागा वर्ग झाली नसल्या कारणाने कचऱ्याची समस्या भेडसावत असून उपाय योजना करता येते नाही. जागा आम्हाला त्वरित मिळावी त्यामुळे आम्ही गावातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणे शक्य होईल.तसेच कचऱ्यामुळे ज्या आरोग्य विषयीच्या समस्या निर्माण होतात त्या कमी होतील.”
किशोर घोडे, सरपंच, निमगाव सावा
प्रतिक्रिया २
“पुलाजवळ कचरा टाकल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाने गावात रोगराई वाढत चालली आहे. त्यामुळे ठिकाणी असणारी स्थानिक स्वराज संस्था म्हणून ग्रामपंचायतीने सदर समस्येबाबत कार्यवाही करावी.”
अजित गाडगे, सामाजिक कार्यकर्ते, निमगाव सावा