एकेरी वाहतुकीचे आदेशाचे उल्लघंन करणा-या १६० वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडुन कारवाई

1 min read

लोणावळा दि.३०:- लोणावळा शहरात वाहतुक सुरळीत चालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल ते रानडे हॉस्पीटल अशी एकेरी वाहतुकीचे नियमन करुन. त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले असतानाही वाहन चालक हे वारंवार सदरहू आदेशाचा भंग करुन एकेरी मार्गाचे उल्लघंन करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलिसांनी विशेष मोहिम राबवुन एकेरी मार्गाचे उल्लघंन करणा-या एकुण १६० मोटार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातर्फे वाहन चालकांना सदर एकेरी मार्गाच्या आदेशाचे पालन करणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे