गुंजाळवाडी वर रात्री ड्रोन ची नजर; दोन दुचाकीची चोरी; गावात भीतीच वातावरण
1 min read
बेल्हे दि.१९:- गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील ड्रोनची दहशत दिसून पसरली आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बऱ्याच गावांमध्ये सध्या ड्रोनचा धुमाकूळ सुरू आहे. रात्रीच्या वेळेला हे ड्रोन घरांवरती टेहाळणी करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. गुंजाळवाडीतील गुंजाळ मळ्यात गुरुवारी (दि.१८) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ रामा गुंजाळ, सचिन गुंजाळ, भाऊ गुंजाळ, शंकर गुंजाळ, राहुल गुंजाळ यांनी घरांवर दोन ड्रोन फिरताना पाहिले. या घटनेनंतर रात्री शिवाजी धोंडीबा गुंजाळ यांची शाईन गाडी (दुचाकी);त्यांच्या घरापासून चोरी गेली .
व ती सकाळी म्हसोबा झाप या ठिकाणी बेवारस आढळून आली. तसेच भाऊ आबाजी गुंजाळ यांची दुचाकी घराजवळून चोरून नेले व ती गावातील एका उसाच्या शेतात सापडली असल्याची माहिती दुचाकी मालकांनी दिली.
पोलिसांनी या ड्रोनचा छडा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच या ड्रोनमुळे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा, गुंजाळवाडी, बेल्हे, जाधव वाडी परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरला आहे.