दहावी पास मुन्नाभाई एमबीबीएस ने पाच वर्ष चालवले क्लिनिक; रुग्णांच्या लागत होत्या रांगा; गुन्हा दाखल; जुन्नर तालुक्यात ही बोगस डॉक्टर ची चौकशी व्हावी

1 min read

पुणे, दि.१४:- लोणीकाळभोर येथील एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डॉक्टर म्हणून मागील पाच वर्षे प्रॅक्टीस करणारा हा व्यक्ती फक्त दहावी पास आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या क्लिनिकला रुग्ण अॅडमिट करण्यासाठी एक बेडही आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये त्याने मागील पाच वर्षांत हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत.या पार्श्भूमीवर जुन्नर तालुक्यात ही असे मुन्नाभाई एमबीबीएस आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रकाश रंगनाथ तोरणे (वय ६३, रा. कदमवाकवस्ती, मुळ श्रीरामपुर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याविरुध्द महापालिकेच्या अधिकारी डॉ. रुपाली रघुनाथ भंगाळे (वय ३८ रा. काळेपडळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. तोरणे याचे जनसेवा नावाने कदमवाकवस्ती येथे क्लिनिक होते. सध्या, वातावरणातील बदलामुळे शहरात विविध आजारांची साथ असल्याने त्याच्या क्लिनिकमध्येही रुग्णांच्या रांगा लागत होत्या.

प्रकाश तोरणे याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याची खबर एक जागरूक नागरिकाने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पथक त्याच्या क्लिनिकवर गेले. तेव्हा त्यांना तेथे जनसेवा क्लिनिकचा बोर्ड दिसला. मात्र, तोरणे याच्या नावापुढे कोणतीही डिग्री नमूद केलेली नव्हती, त्यामुळे त्यांना संशय आल्याने, त्यांनी अधिक तपासणी केली. तेव्हा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिन यांच्याकडेही त्याची नोंदणी नसल्याचे आढळले. इतकेच नव्हे तर त्याच्याकडे कोणतीच पदवीही नाही. तो फक्त दहावी पास असल्याचे समोर आल्याने पथकालाही धक्का बसला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे