श्री रंगदासस्वामी विद्यालयाचा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

1 min read

आणे दि.१७:- श्री. रंगदासस्वामी प्राथमिक , माध्यमिक आश्रम शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यालयातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा केल्या.

यामध्ये काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज,संत चोखोबा या पात्रांच्या वेशभूषा केल्या हा दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणा मार्गाने संत गोरोबाकाका मंदिर, श्री राम मंदिर, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री. रंगदासस्वामी महाराज मंदिर या ठिकाणाहून टॅक्टर रॅली द्वारे.

लिझिम, टाळ विणा, मृदूंग, आभंग भजन हरीनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात काढण्यात आला या दिंडी सोहळयात सर्व विद्यार्थी यांनी वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्राची पारंपरिक परंपरा जोपासून कलेचे सादरीकरण केले.या दिंडी सोहळयामध्ये ह.भ.प. अशोक महाराज शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. गावच्या सरपंच प्रियांका दाते याही या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

दिंडी सोहळ्याचा शेवट विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कीर्तन सेवा करून संपवण्यात आला यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सासवडे व अश्विनी सोनटक्के यांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे