विद्यानिकेतनच्या विद्यार्थांनी वृक्षदिंडीच्या माध्यमातून केले समाजप्रबोधन
1 min readसाकोरी दि.१५:- साकोरी (ता. जुन्नर) येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी तसेच पी एम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती विद्यानिकेतन संकुलाचे अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी दिली.
सोहळ्यात विठ्ठल रखुमाई टाळकरी वारकरी तुळशीधारी तसेच मुली व मुले यांनी दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, संत जनाबाई, संत नामदेव, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ अशा विविध संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. दिंडीच्या अग्रभागी पालखी होती.
तसेच विद्यार्थ्यानी समाजप्रबोधनपर वेगवेगळे संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली. ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करत दिंडी साकोरी धाम मंदिराजवळ विसावली. शाळेचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले.
सदर दिंडी सोहळ्याचे नियोजन विद्यानिकेतन पी.एम. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे आणि विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या रूपाली (पवार) भालेराव तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले.