भावडी येथे चिमुकल्यांची निघाली दिंडी

1 min read

भावडी दि.१३:- पंढरीच्या वाटेवर पांडुरंगाच्या भेटीसाठी विविध दिंडयांतुन लाखो वारकरी पायी निघाले असताना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भावडी तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात दिंडी काढली, वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी भगव्या पताका घेऊन, मुलींनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतले होते. ग्यानबा तुकाराम चार जयघोष करीत टाळ वाजवत पालखीसह दिंडी गावातुन वाजत गाजत नेली या चिमुकल्यांची सरपंच कमल कातळे, उपसरपंच सोपानराव काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे, भारतीय विद्यार्थी सेना मा तालुका प्रमुख प्रा अनिल निघोट, पंडित काळे, मनोज चक्कर व ग्रामस्थांनी कौतुक केले.

या दिंडी साठी मुख्याध्यापिका सीमा कहडणे, मंगेश बुरुड व रुपाली कामठे यांनी दिंडी साठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांचेही ग्रामस्थांनी खास कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे