श्री रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
1 min read
आणे दि.५ (वार्ताहर):- जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार (दि.५) आणे येथून झाले.यात एकूण साडेतीनशे वारकरी सहभागी झाले होते. हभप तान्हाजी महाराज दाते, हभप धनंजय महाराज वनवे, ज्ञानेश्वर विष्णू आहेर यांच्या मार्गदर्शना खाली दिंडीचे प्रस्थान झाले. पायी दिंडीचे हे १५ वर्ष आहे.
टाळ, मृदंग, वीणाच्या तालावर विठ्ठलाचा जयघोष करत ही दिंडी निघाली. दिंडीमध्ये वयोवृद्धांप्रमा ने तरुणांनी ही सहभाग घेतला आहे.
ही दिंडी आणे, नांदूर पठार, कोपर्डी, राशीन, मांजरगाव, दहिगाव, टेंभुर्णी, करमाळा या मार्गे पंढरपूर ला मंगळवार (दि.१६ ) रोजी पोहचते.
रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल व श्रीरंगदास स्वामी देवस्थान आणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची शौचालयाची अडचण होऊ नये म्हणून फिरते शौचालय देण्यात आले. या फिरत्या शौचालयात पाच पुरुष व पाच महिला शौचालय आहेत.
या शौचालयाचे लोकार्पण नुकतेच आणे येथे करण्यात आले होते .या वेळी रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विजयकुमार आहेर व रंगदास स्वामी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते व विश्वस्त, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल चे संस्थापक महावीर पोखरण व खजिनदार विमलेश गांधी, रोटरीयन हेमंत वावळ, अंकुश शिंदे, अक्षय शिंदे व ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाले होते.