श्री रेडा समाधी मंदिर ते पंढरपूर पायीवारी पालखी मार्गस्थ
1 min read
आळेफाटा दि.२९:- ज्ञानोबामाऊली तुकाराम, पायी हळुहळू चला मुखाने हरिनाम बोला तसेच जय जय राम कृष्ण हरिच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात आळे (ता.जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या
श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार दि.२९ रोजी झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांणी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे या ठिकाणी असुन गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी निघत असते.
या वर्षी पण अतीशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत असुन प्रस्थानाची महापुजा शिवनेर भुषण ह.भ.प.राजाराम महाराज जाधव व सुदाम महाराज बनकर व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सचिव अजित कु-हाडे, सरंपंच सविता भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर ह.भ.प.रामदास महाराज सहाणे यांच्या कडे वीणा देऊन व
श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष होणाजी गुंजाळ तसेच पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हतुजी सहाणे, कार्याध्यक्ष नागेश कु-हाडे यांच्या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष अमोल भुजबळ, सचिव सुनिल जाधव, खजिनदार विलास शिरतर, धनंजय काळे, प्रसन्न डोके,
व्यवस्थापक कान्हू कु-हाडे, संदिप निमसे, निलेश पिंगळे, अविनाश कु-हाडे, संतोष कु-हाडे, जिवन शिदे, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, गणेश शेळके, संदीप पाडेकर ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर, गणेश गुंजाळ, राजेंद्र धोंगडे, अरूण गुंजाळ, आदी मान्यंवर ग्रामस्थ, तसेच वारकरी उपस्थित होते.
दरम्यान हा दिंडी सोहळा आळे, बेल्हा, पारगाव (मंगरूळ) हाजीटाकळी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, दौंड, काळेवाडी, भिगवत स्टेशन, पळसदेव, वनगळी, संस्थान रांझणी देवाची, टेंभुर्णी, करकंब या गावांमध्ये मुक्काम करत मंगळवार (ता. १६ जुलै) रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.
दिंडी सोहळयाच्या प्रस्थाना अगोदर गावातीलच रहीवाशी सागर वर्पे यांनी स्वखर्चाने रेडा समाधी मंदीर ते आळे गाव तीन किलोमीटर अंतर असुन या रोडवर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती.